Shirur Election Results | शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे सध्या आघाडीवर आहेत. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला उमेदवार उतरवला आहे. येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी अमोल कोल्हे यांची थेट लढत आहे. शिरूरमध्ये अजित पवारांनी आपल्या बऱ्याच सभा गाजवल्या.त्यामुळे ही जागा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर
आज 4 जूनरोजी लोकसभेचा निकाल लागत आहे. आता हाती आलेल्या कलानुसार येथे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे पहिल्या फेरीत 6 हजार 116 मतांनी आघाडीवर होते. आता चौथ्या फेरीत देखील कोल्हे यांनी तब्बल 21400 मतांनी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
निवडणूक प्रचारमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते. कोल्हे यांनी तर पुरावे देखील सादर केले होते. त्यामुळे या लढतीत इथे कोण बाजी मारणार, याकडे (Shirur Election Results )राज्याचं लक्ष लागलं आहे.
अमोल कोल्हे vs शिवाजी आढळराव पाटील
अजित पवारांनी प्रत्येक सभेत कोल्हे यांना टार्गेट केलं होतं. त्याबदल्यात कोल्हे यांनी देखील जशास तसं उत्तर दिलं. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर या दोन्ही गटाकडून एकेमकांवर सतत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा उमेदवार आघाडीवर म्हटल्यावर हा अजित (Shirur Election Results ) पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
News Title – Shirur Election Results Amol Kolhe lead
महत्त्वाच्या बातम्या-
अमरावतीतून मोठी बातमी समोर; नवनीत राणांवर कॉँग्रेसची आघाडी
अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?
राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती, कोण मारणार बाजी?
शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं