बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा

पुणे| चासकमान प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील भूसंंपादन चुकीच्या पद्धतीने झाले असून धरणग्रस्तांना जमिन वाटप करताना प्रशासनाचा अनागोंदी कारभार शेतकऱ्यांनी उजेडात आणला आहे. या प्रकरणाची चौकशी करून शिरूर- हवेली तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार अ‌ॅड. अशोक पवार यांनी पुनर्वसनमंत्री यांच्याकडे केली आहे.

आमदार पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह वडेट्टीवार यांची भेट घेतली. या वेळी डॉ. धनंजय खेडकर, सुर्यकांत वाघोले, मच्छिंद्र उमाप, भाऊसाहेब कदम, गौरव जाधव, राजाराम ढमढेरे, विकास हरगुडे, आप्पा दरेकर, बाळासाहेब चव्हाण, ज्ञानोबा जकाते, आदू शेतकरी उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील चासकमान लाभक्षेत्रात वीर, भामा, आसखेड, उजनी, गुंजवणी, टेमघर, कळमोडी आदी प्रकल्पांचे पुनर्वसन करण्यासाठी चुकीच्या व अधिक संपादित केलेल्या जमिनींचे वारेमाप, बेकायदा नियम आणि कायदे धाब्यावर ठेवून वाटप केले.

काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाच्या नावाखाली  लाटल्या आहेत. भूसंपादनामध्ये तात्कालीन भूसंपादन व पुनर्वससन, अपात्र प्रकल्पग्रस्त एजंट आदींची मोठी साखळी आहे. ही बाब आमदार पवार आणि शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

ट्रेंडिंग बातम्या-

“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

महत्वाच्या बातम्या-

#CoronaVirus : षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? 😂

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही, तो एक प्रतिमात्मक नारा- रामदास आठवले

शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; गावाकडील शाळा मात्र सुरुच राहणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More