मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

Shirur | राज्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघापैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदार संघ. राज्यातील राजकीय समिकरणं जशी बदलली तशाच अनेक मतदारसंघातील राजकीय गणितं देखील बदलली. शिरूर लोकसभा मतदार संघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे तसेच विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे निवडणुकीत आमने-सामने होते. यावेळीही दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान पार पडलं.

अमोल कोल्हेंना होणार फायदा?

मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने मंगळवारी दि.(14 मे) रोजी जाहीर केली आहे. त्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 54.16 टक्के मतदान झालंय. यंदा मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण पाहायला मिळाली. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोसरी आणि हडपसर मतदारसंघांत अपेक्षित असे मतदान झाले नाही. नागरिकांनी सकाळी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदान केलं.

यानंतर घटलेलं मतदान कुणाला फायदेशीर ठरणार याबाबत सध्या चर्चा सुरू झाली. तसेच दोन्ही उमेदवारांची धाकधूक देखील वाढली आहे. मात्र कमी मतदान अमोल कोल्हेंना फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे. याला कारणं देखील तशीच आहेत.

शरद पवारांप्रती लोकांच्या मनात असलेल्या सहानुभूतीचा फायदा हा अमोल कोल्हेंना होणार असल्याचं दिसतय. तसेच दुसरीकडे कट्टर शिवसैनिक ओळख असलेल्या आढळरावांनी निवडणुकीच्या तोडांवर पक्ष सोडला आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीच ते सामिल झाले. यामुळे मूळ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळालं.

Shirur | सर्वांत कमी मतदान हडपसरमध्ये

शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर आणि भोसरी हे शहरी मतदारसंघ नेहमीच निर्णायक भूमिका बजावत असतात, मात्र, यावेळी सर्वांत कमी मतदान हडपसर मतदारसंघात झालं आहे. आता मतदारांनीच पाठ फिरवल्याने मतदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा संधी देणार, की सलग तीन वेळा निवडून आलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करणार यांची प्रचंड उत्सुकता आहे. दोघांचंही भवितव्य मतदान यंत्रात बंद असून 4 जूनला फैसला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा

ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

“मोदीजी आता कांद्यावर बोला”; मोदीजी म्हणतायेत जय श्रीराम