Top News

अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

अहमदनगर | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचं निदान अवघ्या 15 मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचं मोठं योगदान आहे. या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.

शितल रंधे यांच शिक्षण एम.एस्सी. बायोटेक झाले असून, त्या कुसगाव येथील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास विभागात प्रमुख आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. या कंपनीने प्रेग्नन्सी, डेंग्यु, एचआयव्ही, एचसीव्ही याचे निदान करणाऱ्या टेस्ट किट बनवल्या आहेत.

किट पुण्यातील आयसीएमआर, एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवल्या. दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून या किटला मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल आॅरगनायझेशन (सीडीएससीओ) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, 15 मिनिटांत कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाला की नाही? याचं निदान या किटमुळे होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या