Top News महाराष्ट्र मुंबई

शिवसैनिक आक्रमक, ईडी ऑफिसवर लावले भाजपचे बोर्ड

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. तेव्हापासून शिवसैनिक अॅक्शन मूडमध्ये आले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात केला आहे.

राऊत म्हणाले की , “आपण सगळे कालपासून, खासकरुन मीडिया एक प्रश्न विचारत आहे. ईडीच्या नोटीसचं काय झालं? आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी किंवा इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना देशात प्रतिष्ठा होती. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटलं, तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे.”

सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात, अशी टीकाही राऊतांनी विरोधकांवर केली.

दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवरुन ‘आ देखे जरा किसमे कितना है दम…’, असं म्हणत भाजपा नेत्यांना आणि मोदी सरकाराल चॅलेंज दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाची आत्महत्या

पंजाबमधील शेतकरी आक्रमक; उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल!

‘…तर हे माझं शेवटचं आंदोलन असेल’; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये

“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या