बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुडाळ परिसरात शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलीस घटनास्थळी दाखल

सिंधुदुर्ग | कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. आफ्रिका करोल यांना 9 मते तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली आहेत.  त्यातच कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं.

नगरपंचायतीच्या आवारामध्ये वाहने नेण्यास परवानगी नसतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक गाड्या आतमध्ये घेवून गेले होते. यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शेकडो कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही गटांमध्ये राडा होऊ नये यासाठी दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आलं आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्यानं नगरपंचायतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. भाजप कार्यकर्ते ज्यावेळी नगरपंचायतीच्या आवारामध्ये वाहने आणत होते तेव्हा त्यांना रोखण्यात आलं होतं. आमच्या गाड्या रोखल्या मग शिवसेनेच्या का थांबवल्या नाहीत?, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. यामुळे दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली.

दरम्यान, महाविकास आघाडीला बहुमत मिळाले मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलांनी पैशाचा बाजार मांडला, आमिषे दाखवण्यात आली. परंतु, नगरसेवकांनी आमिषे जुगारली होती. मतदानाला जाऊ नये म्हणून अडवलं गेलं होतं पण शिवसेनेनं हा प्रयत्न हाणून पाडला होता. दबावाचं आणि दादागिरीचं राजकारण शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-  

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंची मोठी घोषणा, म्हणाले…

“नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत, त्यांनी कितीही…”

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

मोदींच्या काळात ‘इतक्या’ कोटी रूपयांची बँक फसवणूक, राहुल गांधीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“युपी बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More