“शिवसैनिकांनी योग्यच केलं, सत्तेत असलो तरी असले प्रकार सहन करणार नाही”
नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी एअरपोर्ट या कंपनीकडे देण्यात आला होता. 13 जुलैला हा ताबा अदानी कंपनीला मिळाला. त्यानंतर कंपनीने विमानतळावर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी अदानी एअरपोर्ट असा नामफलक लावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या विमानतळावर हा फलक लावण्यानं त्यावर शिवसैनिकांनी आक्षेप घेतला होता.
कंपनीच्या या वर्तनावर शिवसैनिकांनी जाहिर नाराजी व्यक्त करत अदानी एअरपोर्ट लिहिलेल्या या नामफलकाची तो़डफोड केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अदानी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी शर्टवर देखील अदानी विमानतळ असं लिहिलं आहे. तर, टी-शर्टवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव छोट्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे, असा आक्षेप शिवसैनिकांनी घेतला होता. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कंपनीने स्वतःच्या नावाचा फलक लावला होता. शिवसैनिकांनी जे केलं ते योग्यच केलं. त्यात चुकीचं काय?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना सत्तेत असली तरी असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे. कोणी मालकी दाखवून असे प्रकार करत असेल तर, असे प्रकार खपवून घेणार नाही. काल झालं तसंच होत राहणार, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, अदानी कंपनीने फक्त पुर्वीच्या ब्रँडिंग कंपनीची जागा घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाचा आणि टर्मिनल ब्रँडिंगमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही, असं अदानी समुहाकडून सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”
खेळत-खेळत चिमुकला आला रस्त्यावर, भरधाव वेगात मागून गाडी आली अन्…, पाहा व्हिडीओ
पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; वाचा आजचे ताजे दर
“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”
भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव
Comments are closed.