बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक आणि शाईफेक

वाशिम | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज वाशिम दौऱ्यावर होते. यातच आज त्यांच्या गाडीवर दगडफेक झालेली पाहायला मिळाली. यातच शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दगडफेकीच्या घटनेविषयी सांगितलं आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा आरोप केला आहे. खासदार भावना गवळी ग्रुपचे 100 कोटींचे घोटाळे, हायवे कंत्राट अडथळे, खासगी कंपन्या, बँका, पोलीस स्थानकाला भेट देणार असल्याचं सांगितलं.

देगाव येथील भावना गवळी यांच्या रिसोड येथील बालाजी पार्टिकल बोर्ड या कारखान्याला भेट देणार आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केला आहे.

दरम्यान, स्वत: किरीट सोमय्या यांनीही या घटनेचे फोटोज ट्विट केले आहेत. किरीट सोमय्या हे या ठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

 

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून मी दिवसभरात फक्त एकच वेळ जेवतो- नरेंद्र मोदी

“शुद्धीकरणसाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायचा ना आमच्याकडे खूप आहेत”

शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता- देवेंद्र फडणवीस

दुसरी लाट नियंत्रणात पण ‘या’ जिल्ह्यांनी संपुर्ण महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं!

“नेहरू आणि वाजपेयी हे आदर्श नेते, सर्व पक्षांना आत्मपरिक्षणाची गरज”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More