मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत चौकशीसाठी जातील तेव्हा सक्तवसुली संचालनालय अर्थात, ईडी कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शनाचा शिवसेनेच्या हालचाली सुरू होत्या. तूर्त अशा प्रदर्शनाची गरज नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे
मोर्चाच्या बातमीवर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सायंकाळी आपली भूमिका समाजमाध्यमांवर मांडली.
निदर्शनाच्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे, तेव्हा उतरू, पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला?, असं राऊत म्हणाले.
ह्या बातम्या चुकीच्या आहेत.
रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस
कायद्यानेच चोख उत्तर देऊ.
कर नाही त्याला डर कशाला?
शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच.तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो. pic.twitter.com/n2pxBfxpBn— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2021
थोडक्यात बातम्या-
“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”
“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”
क्रूरतेचा कळस! सांगवीत पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…
“संधीची वाटच पाहतोय, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू”
“केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी”