बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंवर महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत. य़ाच पार्श्वभूमीवर नारायण राणेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थात कल्याण येथे शिवसैनिकांनी कोंबडी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी नारायण राणेंच्या पुतळ्याला चपला मारून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. परंतु तो पुतळा जाळण्यापूर्वी पोलिसांनी तो हिसकावुन घेतला.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेनेेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे अरविंद मोरे, रविंद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी अभिषेक मोरे, योगेश निमसे, सुचेत डांबरे, सुरज खानविलकर, भूषण तरडे आदीनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनामध्ये यावेळी नारायण राणेंंच्या पुतळ्याला चपला मारण्यात आल्या. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पुतळा जाळण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी हातात कोंबड्या घेऊन तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान,  नारायण राणे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच राणेंनी याअगोदरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चुकीची आणि बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या जीभेला आवर घाला. शिवसैनिकांचा संयम पाहू नका. आमचा संयम सुटला तर आवर घालता येणार नाही, असं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शुद्ध दुधासाठी 10 मित्रांनी सुरु केला गीर गायींचा गोठा…, पाहा व्हिडीओ

“नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं नाही तर नरेंद्र मोदींचं”

रक्षाबंधनदिवशी पुणे पीएमपीने कमवले तब्बल इतके लाख रुपये, पाहा व्हिडीओ

राणेंच्या पुण्यातील माॅलवर शिवसैनिकांकडून दगडफेक!

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More