बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणेंच्या पुण्यातील माॅलवर शिवसैनिकांकडून दगडफेक!

पुणे | नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण पेटलं आहे. शिवसैनिकांनी तर राज्यभर राडाच घातल्याचं पाहायला मिळत आहे. राणेंच्या घरापुढे शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. अशातच याचे पडसाद पुण्यातही मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

नारायण राणेंच्या आक्षेपार्ह टीकेमुळे पुण्यातील गुडलक हाॅटेल, डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडल्याचं समोर येत आहे. महिला शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला जोडे मारले असून राणेंनी उद्धव ठाकरे यांची माफी मागावी. अन्यथा नारायण राणे यांना पुण्यात फिरू देणार नाही, अशी घोषणाबाजी पुण्यातून ऐकू येत आहे.

पुण्यात शिवसैनिकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात कोंबड्यादेखील सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. यासोबतच ‘नारायण राणे चोर है’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान, नारायण राणेंच्या वक्तव्यानं राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. राणेंच्या वक्तव्यानं शिवसैनिकांची भावना दुखावली असून त्यांनी राज्यभर एकच खळबळ माजवली आहे.

थोडक्यात बातम्या – 

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

“तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील”

नारायण राणेंना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही- भास्कर जाधव

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More