बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे शिवसैनिक नाराज”

मुंबई | शिवसैनिकांनी जनतेसाठी काम करावं, विकासकामे करावीत, असा संदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. पण आमदारांना विकास कामासाठी शासनाकडून निधी द्यावा लागतो. मात्र दुर्दैवाने अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे आज शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक नाराज आहेत, असं म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमांद्वारे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसंपर्क अभियानाची घोषणाही केली. यावर प्रविण दरेकरांनी टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काय होईल, युतीचं काय होईल, उद्या अचानक निवडणुका लागल्यास त्यांना सामोरे कसं जायचं? त्यामुळे उद्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत शिवसैनिकांना ताकदीनं उभं करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज हा संदेश दिला असावा, असा टोला दरेकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

शिवसेना पक्षप्रमुखांचा आजचा संदेश म्हणजे अलीकडच्या काळातील तिन्ही पक्षांच्या सरकारमधील विसंवाद असल्याचं स्पष्ट दिसत आहे. युती आणि आघाडीबद्दल वेगवेगळी राजकीय समीकरणं सांगितली जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांना प्रेरणा आणि चेतना देण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुखांना पर्याय नाही, असंही दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

एकनाथ खडसेंनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स!

‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं शक्य’; शक्तिकांत दास यांनी केंद्राला दिला हा सल्ला

“कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

“चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्यात, किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार” 

‘माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा’; नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी केल्या ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More