बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

मुंबई | शिवसेनेने मुंबईच्या रस्त्याच्या कामांमधील कंत्राटांमध्ये ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना संधी देण्यासाठी अटींमध्ये फेरफार केलं आहे. आगामी निवडणुकीसाठी शिवसेना पैसे गोळा करत आहे, म्हणून हे असले उद्योग सेना करत आहे, असा धक्कादायक आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. ते आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रशासन आणि महानगरपालिका काळ्या यादीतील कंत्राटदारांसोबत करार करत आहेत. त्या करारातूनच पैसे गोळा करण्याचा शिवसेनेचा डाव आहे. आता पुन्हा महापालिका 2 हजार कोटींची कामे कंत्राटदारांना देत आहे. 2016 ठेकेदार होते, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं होतं. त्यानंतर एक नियोजित टेंडर प्रणाली सुरू झाली आहे. त्यामध्ये आता अनेक ठेकेदारांना सहभागी होता येतं. त्याचबरोबर 1200 कोटी रूपयांचं टेंडर आता महापालिका काढत आहे. मास्टिक फ्लॅटसोबत त्यांचं एमओयु असेल, त्यांनाच टेंडर देण्याची अट पालिकेने घातली आहे. मात्र हे मास्टिक फ्लॅण्ट जे कंत्राटदार काळ्या यादीत होते त्यांचेच आहेत, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेने ब्लॅकलिस्ट ठेकेदारांना काम मिळावं म्हणून शिवसेना षडयंत्र रचत आहेत. शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत, म्हणून ब्लॅक लिस्ट ठेकेदारांना आत घेण्यासाठी पालिकेने टेंडर प्रकियेत बदल केले आहेत. पालिकेत विरप्पन गॅंग कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. सेनेचं या ब्लॅक लिस्ट ठेकेदारांवर कसलं प्रेम आहे, हे आता जाहीर करावं, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबईकरांना खराब रस्त्यांची समस्या प्रत्येक वर्षी भेडसावत असते. यासाठी प्रत्येक वर्षी राजकीय नेते आंदोलन करतात. परंतु मुंबईमधील रस्त्यांबाबत अजूनही पालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मनसे सध्या या प्रकरणाबाबत आक्रमक झालेली दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

…जेव्हा नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहतात; पाहा व्हिडीओ

अजित पवारांच्या आदेशानंतरही महाविद्यालयं उघडली नाहीत, कारण…

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More