बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाने धनुष्यबाणाशी जुळवून घेतलं, घड्याळाचं टायमिंग चुकलं, कमळाचं गणित हुकलं!

परभणी | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. पण हे राजकीय समिकरणं बिघडवण्याचा एक प्रकार परभणीत घडलाय. राष्ट्रवादी आणि भाजपला हुलकावणी देत शिवसेना आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश वरपुडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या राजेश गोरेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या मतांची बेरीज फिरल्याने अखेर भाजपच्या रामप्रसाद बोर्डिकर यांनी माघार घेतली.

राष्ट्रवादीच्या सदस्यांना एकत्र करत भाजप आणि राष्ट्रवादीने गणित बसवण्याचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादीचे आमदार बाबाजींनी चार सदस्यांना वेगळं करून अध्यक्षपदाची मागणी केली. यातून भाजप आणि राष्ट्रवादीने गणित फिसकटलं.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीचा फायदा घेत शिवसेना आणि काँग्रेसने बाजी मारली. एकूण 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 10 जागा जिंकत शिवसेना आणि काँग्रेसने अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केला. तर वरपुडकर यांना 9 जागा मिळाल्या.

थो़डक्यात बातम्या-

‘…अन्यथा उद्रेक होईल’; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

गृहमंत्रिपदी विराजमान होताच दिलीप वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा, मात्र तरीही ‘ही’ एक गोष्ट पडू शकते महागात!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More