बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

मुंबई | सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने  आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत.

नुकतंच सोमय्या यांनी मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांनी देखील आता किरीट सोमय्यांना उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांच्या या आरोपांवर बोलताना हसन मुश्रीफ यांनी शिवसेना आणि आमचं नातं फेव्हिकॉलचं असल्याचं म्हटलं आहे. भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या प्रयत्नात भाजप केव्हाच यशस्वी होणार नसल्याचं देखील मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, किरीट सोमय्यांनी माहिती घेऊन आरोप करावेत. या कारखान्याचं कर्ज फेडून दहा वर्ष झालेत. खोटं बोल पण रेटून बोल, असं सोमय्यांचं सुरु आहे. तुम्हालाही मुलेबाळे आहेत असे खोटे आरोप करू नका.

आरोप करुन पर्यटनाला जायचं हे मुश्रीफांनी बंद करावं. माझ्या प्रेमापोटी लोक जमले होते. परंतु मी पत्रक काढून सोमय्यांना निमंत्रण दिलं. तुम्ही येऊन कारखाना बघा. लोकांशी बोला तुम्हाला हसन मुश्रीफ कळेल, असं देखील मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मला सहा तास कोंडून ठेवलं, अन्…’,पत्रकार परिषदेत सोमय्यांचा गंभीर आरोप

झंझावाती खेळी करत ऋतुराज गायकवाडने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

देव तारी त्याला कोण मारी! धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्…

सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपमधील ‘हा’ नेता; मुश्रीफांचा धक्कादायक आरोप

“चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखवावा, समोर येऊन लढावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More