मुंबई | फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.
शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत.
दरम्यान, येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे
जळगावातील खळबळजनक घटना; पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान; बोरिस जॉन्सन यांच्याकडून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा
सोहेल खान, त्यांचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानविरोधात FIR दाखल!
‘महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकाराल का?’; नाना म्हणाले…