बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अब्दुल सत्तारांनी पुन्हा छेडला ‘सेना-भाजप युती’चा राग, म्हणाले..

औरंगाबाद | शिवसेना आणि भाजप  दोन्ही पक्षांंमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद इतका चिघळला की, शिवसेना आणि भाजप युती तुटली. त्यातच आता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. ते सिल्लोड येथे बोलत होते.

अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं युतीसाठी पुढाकार घेवू शकतात, असं म्हटलं आहे. नितीन गडकरी सेना आणि भाजपमधील युतीचा पुल बांधू शकतात. दोन व्यक्तींची मन जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही. मात्र, मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे त्यासंदर्भात निर्णय घेतील, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

नितीन गडकरी हा माणूस गेल्या तीस वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं आहे. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात आणि मनही जुळवू शकतात, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. तसेच मी कालही तेच विधान केलं होत आणि आजही तेच विधान करत आहेत, अशी आठवण अब्दुल सत्तार यांनी  करून दिली.

दरम्यान, युवासेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड येथे दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अब्दुल सत्तार  यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं.  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिल्लोड नगरपरिषदेच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

Whasapp New Feature: व्हाॅट्सअॅपचं ‘हे’ नवं फीचर लवकरच होणार लाॅंच

मोठी बातमी! संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका

“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डाॅ. अनिल अवचट यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More