बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

मुंबई | नारायण राणे या नावाचीच आज सर्वत्र चर्चा आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नगर, नाशिक, या सर्व ठिकाणी आज आंदोलनं होत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवासेनेने प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं आहे.

नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगल्यासमोर मुंबईभरातून युवासेना कार्यकर्ते एकत्र येत आहेत. महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांच्या भावना या आज तीव्र झाल्याचं पहायला मिळत आहेत. युवासेना नेते वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन चालू आहे.

भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यामध्ये हाणामारी सुद्धा झाल्याचं पहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक, युवासैनिक राणेंच्या घराबाहेर जमले आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देण्यासाठी आलो आहोत, असं वरूण सरदेसाई म्हणाले आहेत.

पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला आहे. नारायण राणे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांना आतमध्ये जाता येवू नये म्हणून बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एका युवासैनिकाचं डोकं फुटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

‘…तरच विसर्जनात सहभागी होता येणार’; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More