“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”
उस्मानाबाद | शनिवारी पहाटे राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तसेच शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इमरान प्रतापगढी विजयी झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांचे नाव न घेता खोचक टीका केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी शनिवारी सहकुटूंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बाळानांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही, असा खोचक सल्ला दिला आहे. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये. बाळासाहेबांच्या आदेशाने पुर्वी सर्व घडत होते. मात्र, आता ते दिवस राहिले नाहीत, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. काही लोक स्वत:ला पक्षप्रमुख समजून पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना असं म्हणण्याची वेळ आली आहे, असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. राज्यसभेच्या निकालापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल, असा टोला बाळानांदगावकरांनी लगावला आहे. आगामी विधान परिषदेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. विधान परिषदेमध्ये योग्य ते घडेल, असं वक्तव्य बाळा नांदगावकरांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजप युतीसंदर्भात बाळानांदगावकरांना विचारण्यात आले असता शिवसेना मनसे युती हा विषय आता इतिहास जमा झाला आहे. आगामी महानगरपालिका आणि इतर निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे, असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही याआधीही एकला चलो रे होतो. आजही एकला चलो रे आहोत, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही; एका राज्यसभेने पुन्हा मुख्यमंत्री बनता येत नाही”
वडिल धनंजय महाडिकांच्या विजयानंतर लेकाला अश्रू अनावर, सर्वांसमोर बाबांना मारली कडाडून मिठी
किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा, म्हणाले…
‘…तर एक हजार कोटी देईन’; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत
Rajyasabha Election Result | राज्यसभेचा निकाल वाचा एका क्लिकवर
Comments are closed.