Top News

“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”

मुंबई | शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी अजान पठन स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची माहिती दिली होती. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले होते. शिवसेना आता सेक्युलर झाली आहे हे शिवसेनेने जाहीर करा असं आव्हान भाजपने दिलं होतं. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, असंही संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यामुळे त्यांनी खाली न येत  ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना यामध्ये आपल्याला मदत करणार असल्याचं आश्वासन अग्रलेखातून देण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीची निवड, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड!

आज तिसरा वनडे! व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोहली अँड कंपनीला अखेरची संधी

‘2021 मध्ये सर्वांना कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे…’; रामदेव बाबांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

“स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा”

‘चहा कसला देता… आम्ही जिलेबी देतो’; शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावुन लावला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या