बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर आता मोठ्या मनाची ढाल समोर करण्याची वेळ भाजपवर आली नसती”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मुख्यमंत्रिपद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून  शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मन आणि अपराध यांच्या सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या विचारसरणीचा केव्हाच अंत झाला. काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे करण्याचं युग आता अवतरलं आहे. यामुळे आता छोटं मन आणि मोठं मन यांच्या वेगळ्या व्याख्या सांगितल्या जात आहेत. हेच मोठ मन भाजपने अडीच वर्षापूर्वी दाखवलं असतं तर मोठ्या मनाची ढाल समोर करण्याची वेळ पक्षावर आली नसती, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय नाट्य घडवलं जात आहे. त्यानुसार पात्रांनी आपापली भूमिका साकारली. सूरत, गुवाहाटी, सर्वाच्च न्यायालय, गोवा, राजभवन आणि सगळ्यात शेवटी मंत्रालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग सादर केला. खरा क्लाॅयमॅक्स तर गुरूवारी झाला जेव्हा जे मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं ते उपमुख्यमंत्री झाले आणि जे उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं ते हमखास मुख्यमंत्री झाले. या नाट्याचेे अजून कीती प्रयोग बाकी आहे हे सांगता येत नाही, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीका केलीये.

हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. जनता ही आंधळा धृतराष्ट्र नाही हे लक्षात ठेवावं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हातून महाराष्ट्राचं हित होवो हिच अपेक्षा, असा टोलाही शिवसेनेनं अग्रलेखातून लगावलाय.

थोडक्यात बातम्या

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस

‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा

‘भविष्यात असे प्रकार…’; टेबलवर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं

“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”

उपमुख्यमंत्री होताच फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More