बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही’; सामनातून विरोधकांवर टीकेचे बाण

मुंबई | बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत ऐतिहासिक निकाल दिला. मराठा आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यानंतर राज्य सरकार कोर्टात आपली बाजू मांडायला अपुरं पडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली आहे.

मराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, हे राज्यातील विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे. शाहबानो प्रकरण, अॅट्रॉसिटी कायदा, 370 कलम रद्द करणे याविषयी केंद्र सरकारने तत्पर निर्णय घेऊन जी न्यायप्रियता दाखवली, प्रसंगी घटनेत बदल केले तीच गती आता केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबतही दाखवेल, अशी अपेक्षा करण्यात गैर ते काय?, असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची ही लढाई महाराष्ट्राने सावध पावले टाकून जिंकलीच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची ढाल पुढे करून आज मराठा आरक्षण नाकारले असले, तरी आर्थिक मागासलेपणाच्या संकटात खितपत पडलेल्या मराठा समाजाला ‘न्याय्य’ निवाडा या आदेशाने मिळाला काय? राज्य सरकारही मराठा समाजाच्या उद्वेग आणि तीव्र भावनांशी पूर्ण सहमत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचा किस पाडून मराठा आरक्षण नाकारले असले, तरी पुढे काय, हा प्रश्न उरतोच, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जी समंजस भूमिका घेतली आहे, तीच भूमिका पुढे नेत विरोधी पक्ष आणि महाआघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी एकजुटीने मराठा समाजाच्या हक्काची ही लढाई पुढे नेली पाहिजे, असा सल्लाही शिवसेनेनं विरोेधी पक्षाला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

चिंता वाढली! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More