बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका केसमधून जामीन मिळाला तर जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवलं जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये अडकवलं जात आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. भाजपशी जुळवून घेतलं तर हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथा आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून बदनामी सुरू असल्याचं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावं असं मला वाटतं. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुद्धा आणि राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळत नसताना, कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेल्या सात महिन्यांपासून लढत आहे, असं सरनाईक म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

एक दिवस दिलासा देऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ

मराठा आरक्षणसंदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More