बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एखाद्या सांगाड्यासारखं हे सरकार भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरलं आहे’, शिवसेनेचा घणाघात

मुंबई | एकनाथ शिंदे य़ांच्या बंडानंतर शिवसेनेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काल राज्यपालांना लक्ष केलं गेलं होतं. तर आज भाजप व शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिंदे गटाला मुख्यमंत्री पद देण्याइतकं भाजपचे मन मोठं नाही. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावती निवडणुकांच्या खाईत ढकलतील, असं सामनात नमूद करण्यात आलं आहे. तर शिवसेनेनं शिंदे गटाला भाजप पुरस्कृत गट असा टोला देखील लगावला आहे.

फडणवीसांचे विधानसभेतील भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते, असा टोला शिवसेनेने लगावला. फडणवीसांनी अभिनंदन प्रस्तावात अदृश्य शक्तीचे आभार मानले. अभिनंदनपर प्रस्तावात शिंदेचं खूप कौतुक केलं.फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? असा प्रश्न महाराष्ट्रारातील जनतेला पडला आहे, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.

मी परत आलो आणि यांनाही घेऊन आलो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पण ज्या प्रकारे ते आले त्यांचा स्वप्नातही विचार केला नसेल. आधीच अडीच वर्षे ते आलेच नाहीत आणि आताही ते दिल्लीच्या तडजोडीने लंगड्या घोडीवर बसले आहेत. ज्याप्रकारे सुरत, गुवाहटी, गोवा करत हे सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने शिंदे सरकारवर केला आहे.

एकनाथ शिंदेंचं बंड म्हणजे स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही. त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतीवीर नाहीत. सत्ता व संपत्तीसाठी झालेलं बंड ऐतिहासित व तात्त्विक नसते, असं उत्तर काल विधानसभेत गुलाबराब पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्याला सामनातून दिलं आहे.

थोडक्यात बातम्या

तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय

‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

बिलाची काळजी करू नका, बिंधास्त हॉटेलमध्ये जेवा; वाचा सविस्तर

पुतिन यांची मोठी घोषणा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘मी कोणालाही घाबरत नाही…’, कालीच्या पोस्टर वादानंतर लिना मनिमेकलाईंचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More