मुंबई | विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. त्याजागी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) आणि दिवाकर रावते हे आमदार होते. मात्र, आता या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झालेत.
आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आणि काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेना पोहोचवली.
थोडक्यात बातम्या-
मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर
“…म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात”
वाढत्या कोरोना रूग्णांमुळे आषाढी वारीवर निर्बंध येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…
शिवसेना आमदाराचा मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलला जाणार का?; आरबीआयने स्पष्टचं सांगितल
Comments are closed.