महाराष्ट्र मुंबई

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!

मुंबई | केवळ ब्रिटनची विमानसेवा बंद करुन कोरोनाला रोखता येईल काय? ब्रिटनमधून इतर देशांत जाणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या संपर्कातून दुसऱ्या देशांद्वारे भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांतून हे संक्रमण होणार नाही का?, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला केलाय.

इतर शे-दीडशे देशांचा गेले 15 दिवस आणि अजूनही ब्रिटन प्रवास सुरूच आहे. त्यामुळे केवळ ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची चाचणी करूनच भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रत्येक देशी-विदेशी नागरिकाला विलगीकरणात पाठवून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी संबंधित सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे, असा सल्ला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्राला दिला आहे.

ब्रिटनमध्ये फैलावलेल्या नव्या घातक विषाणूचे महासंक्रमण रोखायचे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी पहिला कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी उशिरापर्यंत आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू ठेवण्याची चूक आपल्याला किती महागात पडली ते आपल्या समोर आहे, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी केला मोठा खुलासा

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला ‘ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय

…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येबद्दल पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या