बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”

अकलूज | कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या यात्रेवर सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. सरकारच्या या निर्बंधामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने पायी वारी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देखील कडक निर्बंध लावल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

वारकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा भूमिका मांडली. परंतु हे सरकार कान असून बहिऱ्यासारखं करत आहे. किंबहुना या सरकारच्या संवेदनाच गोठल्या आहेत. हे संवेदनशील सरकार असते तर आमची मंदिरे, देवदेवता टाळ्यात आणि कुलुपांत राहिली नसती, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म सर्वकाही बासणात गुंडाळले आहे. जे मंदिरांना टाळे लावू शकतात, त्यांना वारकऱ्यांची किती काळजी असणार?, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली आहे. आम्ही सर्व नियम पाळू असं वारकरी सांगत होते, मात्र सरकारचे धोरण मात्र आम्हाला हवं तसंच आम्ही वागू असं आहे, असं देखील दरेकर म्हणाले.

दरम्यान, नानांच्या नाना तऱ्हा असतात. नाना सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी विड्राॅ होतात. यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे, अशी टीका देखील प्रविण दरेकर यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही”

“जेव्हा लोक मला शिव्या देत होते, तेव्हा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेता केलं”

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठी बातमी!

आयटी क्षेत्रातील ‘ही’ दिग्गज कंपनी 35 हजार जणांना नोकर्‍या देणार!

राहुल वैद्य आणि दिशा परमारची लगीनघाई; हळद, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More