बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

औरंगाबाद | देशातील वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेकडून औरगांबाद येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाचं नेतृत्व खासदार संजय राऊत करणार आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेने कधीच मुस्लिमांना विरोध केला नाही. शिवसेना ही सर्वसमावेशक असल्याचं वक्तव्य केलं आहे.

ते मोर्चाच्या निमित्ताने औरगांबाद येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेने हिंदूत्वाचा आचार आणि विचार कधीच सोडला नसल्याच सांगितल आहे. शिवाय आमच्या हिंदुत्वाच्या व्याखेमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, असं राऊतांनी यावेळी सांगितलं.

यावेळी राऊतांनी इतरही मुद्द्यावर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या कामावरही त्यांनी यावेळी मत मांडलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून एकच आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी ईडीच्या कामकाजावर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांची तब्येत बरी नाहीये. ईडीकडून त्यांना त्रास दिला जातोय. त्यांच्यावर दबाव आणला जातोय असं सांगत कोणतीही तपासयंत्रणा अशी काम करत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. शिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“नोटबंदीमुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो”

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात”

‘लगता है मोहतरमा…’; नवाब मलिकांचं कंगणावर टीकास्त्र

भाजपच्या माजी मंत्र्यावर नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!

“लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More