मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत या निवडणुका स्वतंत्रपणे नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आहे.
आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार याबाबत निर्णय घेतला जाईल, असं शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’; बच्चू कडू भडकले
कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषण
वरूण धवन आणि क्रिती सेनॉननंतर ‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण
रावसाहेब दानवेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…
शिर्डीला जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात