बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो… भाजपने पाठीत खंजीर खुपसला”

पणजी | देशात पाच राज्यांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचार करत आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्याच नाही तर एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठीचही भाजपने खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो. आम्ही शिवसेनेचं किंवा कोणत्याही पक्षाचं नेतृत्व ठरवण्यासाठी इथं आलो नाहीत तर आम्ही केवळ गोव्यांच्या भूमीपुत्रांच्या हक्कासाठी लढायला आलो आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

मागच्या काळात भाजपसोबत युती होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे, अशी शिवसेना पक्षप्रमुखांची भावना होती. मित्राला धोका होऊ नये, हिंदू मतामध्ये फुट पडू नये म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढत नव्हतो. त्या कालावधीमध्ये पक्ष वाढत गेले. काही शिवसैनिक इतर पक्षात गेले. खासदार आणि मंत्री झाले, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्याठिकाणी आमचं अस्तित्व होत तेथून आम्ही लढायला  सुरूवात केली. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लढत आहोत. बिहार आणि बंगालमध्ये लढलो. आज गोव्यात लढत आहोत. गोव्यातील प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा उघडणार आहोत, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मैत्री जपायची म्हणून आम्ही कुठंही लढलो नव्हतो. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असं आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

थोडक्यात बातम्या-

फडणवीस म्हणतात, “संजय राऊतांना कोण घाबरतंय, पाचवीतील मुलंही…”

किरीट सोमय्यांचा सत्कार केलेल्या पायऱ्यांवर काॅंग्रेसनं शिपडलं गोमूत्र

“काॅंग्रेसवालो मत लो मोदीजीसे पंगा…”, रामदास आठवलेंनी सादर केली कविता

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ कारणामुळे सलामीवीर KL Rahul संघाबाहेर

“कुणीतरी हिजाबच्या मागं जातंय, कुणीतरी… महत्त्वाचं काय? देश की धर्म?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More