बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लाज शिल्लक असेल तर नारायण राणे यांनी राजीनामा द्यावा”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलं होतं. रायगडमध्ये पत्रकार परिषद घेताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आज सकाळपासून आंदोलन केलं. त्यानंतर आता नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेने नारायण राणे यांच्यावर आणखी एक निशाणा साधला आहे.

आता जर राणेंमध्ये थोडीही लाज शिल्लक असेल तर त्यांनी घटनेचा आदर राखून राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राणे यांनी गेल्या काही काळात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

जनआशीर्वाद यात्रेच्यावेळी नारायण राणे यांनी नियोजन पद्धतीने गर्दी जमवली होती. त्यावेळी झालेली गर्दी ही आपलं यश आहे, असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे हे यश त्यांच्या डोक्यात गेल्यानं राणे सैरभैर झाले. त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता त्यांना कारवाईला सामोरं जावचं लागेल, असंही राऊत म्हणाले आहे.

दरम्यान, मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत होतो. अचानक तिथं डीसीपी आले, यावर मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हणालो. मात्र त्यांच्याकडे नोटीस नव्हती तरीही त्यांनी मला बळजबरीने अटक केल्याचं राणेंनी सांगितलं आहे. नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता भाजप देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांसाठी पाठवलेल्या विमानाचं अपहरण

अटकेनंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ इशारा म्हणाले…

महाराष्ट्राने आज 3 पक्षांचा तीन पैशाचा तमाशा पाहिला – चंद्रकांत पाटील

नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी साजरी केली दिवाळी; पाहा व्हिडीओ

“नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना शॉक द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More