बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना आक्रमक; आणखी एका नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना (Shivsena) जी आक्रमक झाली ती आजूनही आहे. आरोप- प्रत्यारोप, ट्विटर वार आणि पक्षातून आमदारांची हकालपट्टी सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांना निलंबनाची नोटिस पाठवून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने एका आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

आमदार किरण पांडव यांना शिवसेनेने निलंबनाची (Suspension) नोटीस पाठवली आहे. किरण पांडव हे एकनाथ शिंदे यांचे मानस पुत्र आहेत. एकनाथ शिंंदे यांच्या बंडात ते शामील होते. शिंदे यांचे ते आपतिष्ठ मानले जातात. सुरत आणि गुवाहाटी मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडल्यांच सांगितलं जात आहे.

शिवसेनेकडून शिंदे गटातील 39 आमदारांपैकी 16 जणांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली होती. 11 जुलैला याचा निकाल न्यायालयात लागणार आहे. जर हा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला तर या आमदारांची आमदारकीही रद्द होऊ शकते. काही दिवसापूर्वी सामना (newspaper) मधून आमदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना नेतेपदावरून हटवल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. काही वेळाना ही बातमी चुकून छापून आल्याचं सांगत शिवसेनेने यू टर्न घेतला.

एकनाथ शिंदे यांच बंड संपूर्ण देशात प्रसिद्ध(Famous) झालं आहे. 33 पेक्षा जास्त लोकांनी त्यांची नोंद घेतली आहे. एवढं मोठं बंड महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालं आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह शिवसेनेला हा मोठा धक्का होता. 11 जुलैला च्या न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचं भवितव्य ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही

पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी

‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला

‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More