बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते’; शिवसेनेच्या बड्या नेत्याची गर्जना

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकिकडे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे आणि राष्ट्रवादीने राज्यभर दौरे सुरू केले आहेत. अशातच आता शिवसेनेने देखील शिवसंपर्क मोहिम सुरु केली आहे.

आज शिवसेना भवनात सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. या संघटनात्मक बेैठकीला शिवसेना नेते अनिल देसाई देखील उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अनिल देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते, असं सूचक विधान केलं आहे.

माध्यमांंशी बोलताना अनिल देसाई म्हणाले की, शिवसंपर्क मोहीम हा शिवसेनेचा नेहमीचा उपक्रम आहे. आजच्या बैठकीला पन्नासच्या आत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची संख्या होती. आजच्या बैठकीत दोन बॅच करण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार चर्चा पार पडली.

तसेच कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे.  या गोष्टीचं भान ठेवूनच गर्दी न होता कार्यक्रम संरचना असते. सोबतंच नवीन मतदार नोंदणी आणि निवडणूक पूर्वतयारी देखील असते, यासाठी शिवसंपर्क मोहीम राबवणार आहे, असं देखील अनिल देसाई यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“सामाजिक स्पर्धा आणि माझी परीक्षा”; MPSC विद्यार्थिनीने लिहिलेला हा वास्तवदर्शी लेख नक्की वाचा!

“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”

मराठमोळी सई ताम्हणकर दिसणार ‘या’ हिंदी चित्रपटात, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

पदभार स्वीकारताच नारायण राणे अॅक्शन मोडमध्ये, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना झापलं

“आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More