बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारणात पैसाच बोलतोय मात्र शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष”

मुंबई | येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आता राजकारणात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपची नजर आहे. त्यामुळे आता थेट शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर कडाडून टीका केली आहे.

भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट वापर करण्यात आला. पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकाॅप्टरचा वापर झाला. तो सर्व कारभार पाहता 750 कोटीच्या देणग्या म्हणजे झाडावरून गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील. तिरुपती, शिर्डी ही सध्याच्या काळातील श्रीमंत देवस्थाने आहेत. त्यांच्या दानपेटीत गुप्त धन अशाप्रकारे पडत असते की, एका रात्रीत आपले देव श्रीमंत होतात. त्या खालोखाल राजकीय पक्षांना दान दिलं जातं, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

निवडणुका हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे. काळ्या पैशांचा धबधबा तेथेच वाहत आहे. लोकशाही भ्रष्ट आहे म्हणून राज्य व्यवस्था भ्रष्ट होते. परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता. हा हजारो कोटींचा काळा पैसा परत आणू व देशाची भ्रष्ट अर्थव्यवस्था स्वच्छ करू, असे मोदींचे वचन होते म्हणून लोकांनी मतदान केली. तो काळा पैसा कधी आलाच नाही. तो काळा पैसा निवडणुकीत वाहतोच आहे. गंगेत प्रेते तरंगत आहेत. निवडणुकांत काळा पैसा वाहतो आहे. राजकारणात पैसाच बोलतो आहे, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेनेचं नाव श्रीमंतांच्या यादीत नाही व मोठ्या देणग्या शिवसेनेस मिळाल्याचं दिसत नाही, तरीही लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या पन्नास वर्षांपासून मैदानात लढतेच आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही अनेकांचा पराभव होतो तर अनेक फाटके उमेदवार पैशांचा गाजावाजा न करता श्रीमंतीचा पराभव करून विजयी झालेच आहेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

पुणेकरांना दिलासा; आजपासून आणखी नियम शिथिल होणार, वाचा नव्या गाईडलाईन्स

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या घरात; पाहा दिलासादायक आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More