‘…तेव्हाच शिवसेनेनं हिंदुत्वाला लाथ मारली’; भाजपकडून जहरी टीका
बुलढाणा | नवाब मलिक यांनी दाऊदच्या हस्तंकासोबत जमीनीचा व्यवहार केल्यानंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला अधिकच घेरलं हेतं. त्यातच आता श्वेता महाले यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली आहे.
शिवसेना कॉंग्रेस ज्या दिवशी बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यानी हिंदुत्वाला लाथ मारली, असं वादग्रस्त विधान भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केलं आहे. हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. त्यामुळेच कॉंग्रेससोबत जाणारी शिवसेनाा उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको, असंही त्या म्हणाल्या.
नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यानांच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत आणि हे दुर्देवी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्यां शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, अशी टीका त्यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना केली.
दरम्यान, बुलढाण्यातील चिखली मतदारसंघात 15 वर्षापासून कमळ फुलले नव्हते. त्यानी 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्याची संधी हुकली, मात्र 2019 मध्ये संधी मिळताच त्यांनी या संधीच सोनं केलं. त्या बुलढाण्यातील चिखली मतदार संघातील भाजपचा हा वनवास महाले यांनी संपवला आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
पुतिन यांनी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, धक्कादायक कारण समोर
“आमचे आमदार फुटणार नाहीत, कुणी फुटलाच तर…””
“मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, लोकांच्या आग्रहास्तव…”
Comments are closed.