शिवसेना नेता आठ दिवसांपासून बेपत्ता; राजकीय वर्तुळात एकच खळबळ

Ashok Dhodi

Shiv Sena Leader Ashok Dhodi | पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu) येथे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) पदाधिकारी अशोक धोडी (Shiv Sena Leader Ashok Dhodi) मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असला तरी अद्याप त्यांचा कुठेच थांगपत्ता लागलेला नाही.

अशोक धोडी हे डहाणू विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे पदाधिकारी असून विधानसभा निवडणुकीत समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 20 जानेवारीला त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून घरी येत असल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि ते कारसह गायब झाले. कुटुंबीयांनी त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे.

कुटुंबीयांचा पोलिसांवर आरोप

अशोक धोडी यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली असली तरी, पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, “आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात चकरा मारल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.”

धोडी यांच्या पत्नीने म्हटले की, “माझ्या पतीचं अपहरण झालं असल्याची मला खात्री आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी,” अशी त्यांनी नम्र विनंती केली. त्यांच्या गायब होण्यामागे राजकीय कारण असल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे, कारण धोडी यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावादाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. (Shiv Sena Leader Ashok Dhodi)

गाडीच्या काचा सापडल्याने संशय गडद

धोडी (Shiv Sena Leader Ashok Dhodi) यांच्या गाडीच्या काचा डोंगरीजवळ आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरणाच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. यावरून विविध तर्क-वितर्क लावले जात असून, या प्रकरणात राजकीय हेतू असल्याची शक्यता तपासली जात आहे.

अशोक धोडी यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे त्यांच्या समर्थक आणि स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.

Title: Shiv Sena Leader Ashok Dhodi Missing Abduction Suspected

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .