बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिसांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचं उल्लंघन करत बर्थडे सेलिब्रेशन करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात

मुंबई | महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. तसेच कडक निर्बंध लावून नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन देखील केलं आहे. पण शिवसेना नेत्यानेच कोरोना नियमांना पायदळी तुडवत पोलिसांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार नवी मुंबईतील तुर्भे येथे घडला आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन करून पोलिसांच्या उपस्थितीतच रात्री रस्ता अडवून फटाके वाजवत वाढदिवस साजरा केला. परंतु, पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.

माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी अखेर माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह 9 जणांवर MIDC तुर्भे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कलम 188, कलम 269 व कलम 270 यांच्यासह साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा करत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुरेश कुलकर्णी हे नवी मुंबईतील माजी नगरसेवक असून नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकारी कोरोना नियमांचं उल्लंघन करत असल्याने मुख्यमंत्री यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

भाजपला धक्का! 10 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती बांधलं शिवबंधन

हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी

मुंबईत आज बरे होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, पाहा आकडेवारी

“बाबा रामदेव यांनी माफी मागितली नाही, तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू”

सर्कसमधील खेळ सुरू असताना अचानक सिंहाने ट्रेनरवरच केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More