बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ शिवसेना नेत्याने दिला राजीनामा, म्हणाले…

पुणे | बीकेसीत झालेल्या शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर सडकून टीका केली. आता याटीकेमुळे शिवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसलाय.

उद्धव ठाकरेंनी संघावर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि पुण्याचे माजी शहरप्रमुख शाम देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केलीये. त्यांनी राजीनामा देत शिवसेनेला रामराम केला आहे.

शिवसेना-भाजपा युती तुटल्याने अनेक शिवसैनिकांना दु:ख होत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केल्याने क्लेश होत आहे. भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे, असं देशपांडे म्हणालेत.

संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला आहे अशीच माझी भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे, असं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

प्राजक्ता माळीचा ‘रान बाजार’मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी संतापले!

संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांना मोठा झटका, अत्यंत वाईट बातमी समोर

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात

“ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More