बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘या’ शिवसेना नेत्याची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने केलेल्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत प्रसिद्ध अभिनेता आर्यन खानचा मुलगा अटकेत असल्याच्या विविधअंगी चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच एनसीबीने केलेली कारवाई ही बनावट असल्याचं म्हणत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात अनेक गंभीर आरोप एनसीबीवर केले आहेत.

आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. तसेच या प्रकरणात आता शिवसेना नेत्यानेही उडी घेतली असून शिवसेना नेता आर्यन खानच्या सुटकेसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एनसीबीच्या कामाची चौकशी व्हावी तसेच आर्यन खानच्या सुटकेसाठी ऑनलाईन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आता किशोर तिवारी यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत आर्यन खानसाठी मदत करण्यासाठी पुढाकार घेत, जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

किशोर तिवारी यांनी कार्डेलिया क्रुझ प्रकरणातील कारवाई ही क्षुल्लक असल्याचं म्हणत एनसीबी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाल्याने यात आणखी काय खुलासे होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पाहावं ते नवलंच! जॅकलीन फर्नांडीसची हुबेहुब कार्बन काॅपी आहे ‘ही’ अभिनेत्री

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 227 दिवसातील निच्चांकी नोंद

पुणेकरांना दिवाळीत मिळणार म्हाडाचं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More