मनमोहन सिंग नेहमी संकटांचा सामना करायचे, तुम्ही पळ काढत आहात- संजय राऊत
मुंबई | एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सामान्य माणूस त्रस्त आहे तर दुसरीकडे याच दरवाढीमुळे राजकारण तापताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून विरोधक सरकारला शिंगावर घेत आहेत. तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री नवनवीन शोध लावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ जर तुम्हाला धर्मसंकटात टाकत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला. भाजपला सत्ता ही रामाच्या नावावर मिळाली आहे. सध्या लोकांची समस्या म्हणजे पेट्रोलची दरवाढ करणं. या दरवाढीचं धर्मसंकट काँग्रेसच्या सरकारवर पण होतं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही पळ काढत आहात, असं संजय राऊत म्हणाले.
देशातील जनतेची इंधन दरवाढीपासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. आपण रामराज्यात राहतो. सीता आणि रावणाच्या जन्मदेशात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी आहेत. रामराज्यात दरवाढ शोभत नाही, असंही राऊत म्हणाले. काही दिवसांपुर्वी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. स्वामी यांनी पेट्रोल दरवाढीवरून केंद्रसरकारवर नाराजी दर्शवली होती.
दरम्यान, देशात अनेक शहरात पेट्रोलच्या किंमती 100 च्या वर पोहचल्या आहेत. मागील 3 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नाहीत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90 पार गेली आहे तर मुबंईत दर 97 वर पोहचले आहेत. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर हे आतापर्यतच्या उच्चांकी किंमतीवर पोहचले आहेत.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला 7 पोती शेंदूर, समोर आली तेजस्वी मूर्ती
रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!
‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”
‘भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन…’; पूजा चव्हाणची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल!
Comments are closed.