यवतमाळ | दिल्लीत सुरू असलेल्या शेतरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानाचा हात असल्याचा अजब दावा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवेंवर या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रकर टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच शिवसेना नेत्याने रावसाहेब दानवेंबाबत बक्षीस जाहीर केलं आहे.
रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे. यवतमाळमध्ये या बक्षीसाची केलेली घोषणा चर्चेचा विषय ठरत आहे.
रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल, असंही संतोष ढवळे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण कोणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असं म्हणत ढवळे यांनी दानवेंना इशारा दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही, काम पूर्ण करायला आलोय”
…म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं- शरद पवार
‘एका दगडात दोन पक्षी मारत’, चंद्रकांत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
शरद पवारांकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो त्यांच्याकडे नेहमी…- अमृता फडणवीस
“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”
‘देवेंद्र.. जीवनात मोठं व्हायचं असेल तर…’; फडणवीसांनी सांगितला मुंडेंनी दिलेला कानमंत्र