बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांतदादा, अडवाणींना विचारून घ्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट…”

सातारा | भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आता या टीकेला शिवसेना नेते गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील हे नैराश्यापोटी वल्गना करत आहेत. आपण शिवसेनेचं बोट धरूनच मोठे झाले आहात, हे विसरू नका. असा टोलाही त्यांनी दिला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, ‘तुमचे महाराष्ट्रात निवडून आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर असे आरोप करू नका. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे बोट धरूनच भारतीय जनता पक्ष पुढे आलाय, ग्रामीण भागात तुमचा पक्ष वाढलाय हे विसरू नका. हवं तर अडवाणींना विचारून घ्या,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘भाजपची सध्याची सुत्रे ज्यांच्या हाती आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टींच विस्मरण झालंय का? आमच्या 18 खासदांरावर तुम्ही बोलू नका. निवडणुकीत युती असल्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाला मदत केल्यामुळेच दोघांचे खासदार निवडून आले आहेत, असं सांगून पुढे त्यांनी येत्या निवडणुकीत शिवसेना भाजपला त्यांची जागा दाखवून देईल,’ असा इशाराही देसाई यांनी दिला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. साताऱ्यातील फलटणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यानां उद्देशून देशाच्या राजकारणात जाण्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं, असा खोचक टोला लगावला होता. या टीकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More