सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ शिवसेना नेत्याला अटक
मुंबई | राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून जोरदार राजकीय राडा चालू आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शिवसेनेला (Shivsena) इशारा दिल्यानंतर दोन दिवस मुंबईत तणावाचं वातावरण होतं. नवनीत राणा आणि रवि राणा (MLA Ravi Rana) यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या भेटीला भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्याप्रकरणी आता मोठी घडामोड घडली आहे.
शिवसैनिकांवर सोमय्यांनी गाडी घातल्याचा आरोप मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात महाडेश्वर यांची खार पोलिसांनी चौकशी करून त्यांना अटक केली आहे. परिणामी सोमय्या यांच्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं दिसत आहे.
विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलीस स्थानकात अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या भेटीला जात असलेल्या सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यावेळी त्याठिकाणी महाडेश्वर उपस्थित होते असा आरोप महाडेश्वर यांच्यावर झाला आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्य सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीला सामोरं जात आहे. तर किरीट सोमय्या हे भाजपच्या नेत्यांसह दिल्लीला केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. राणा यांच्या या प्रकरणानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
“भारताचे पुढील पंतप्रधान गौतम अदानी होणार”
‘मी खालच्या जातीची असल्याचं म्हणत त्यांनी मला…’; नवनीत राणांचा अत्यंत गंभीर आरोप
“जर कोणी हिटरल प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर…”
“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या आता मात्र…”
किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.