“शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात संजय राऊतांचा पुढाकार होता”
नाशिक | गेल्या काही दिवसांपासून राज्यात संजय राऊत आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणी आरोप केले आहेत. त्यावरून भाजप नेते गिरिश महाजन यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. नाशिकचे प्रभारी झाल्यानंतर प्रथमच ते नाशिकमध्ये बोलत होते.
संजय राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत राहिलेली नाही. ज्यावेळेस आमची सत्ता होती तेव्हा संजय राऊत कुठे होते. संजय राऊत यांना याआधी कोणीही ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले आहेत, असं गिरिश महाजन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्यानंतर त्यांची ओळख झाली, असा टोला देखील गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वांत मोठा पुढाकार संजय राऊतांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले. आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता राऊत नाव घेतील. ते भंपक वक्तव्ये करत आहेत. आरोप करत आहात तर पुरावे द्या, असं आव्हान गिरिश महाजन यांनी केलं आहे.
दरम्यान, हे गेंड्यांच्या कातडीचे सरकार आहे. यांना जनाची मनाची काहीचं राहिलेली नाही. कुठे बाळासाहेबांची शिवसेना आणि आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देणारी शिवसेना. यापेक्षा शिवसेनेचं दुर्देव नाही, असा घणाघात गिरिश महाजन यांनी केला आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोवर निवडणुका घेवू नका, अशी आमची मागणी आहे, असं गिरिश महाजन म्हणाले आहे.
थोेडक्यात बातम्या-
“ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था झाली नाही”
“…मग राणेंना अटक झाली तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही?”
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
मोठी बातमी! मायदेशी परतण्यासाठी नागरिकांना वाट मोकळी, रशियाने घेतला मोठा निर्णय
मेडिकल शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.