बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर असलेले मतभेद दिसून येतात. नुकतंच शिवसेना आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव पाठवला आहे.

मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजनाला निमंत्रण देत नसल्याने तसंच सातत्याने कार्यक्रमाला डावलत असल्याने राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात सेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव पाठवलाय.

यासंदर्भात योगेश कदम म्हणाले, “दापोली मतदारसंघात खासदार सुनील तटकरे मला डावलून सरकारी कार्यक्रम घेतात. मला निमंत्रण न देता पंचायत समिती सभागृहात सरकारी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. म्हाप्रळ ते आंबेत फेरी बोट सेवा सुरु करण्याच्या कामाचं मला निमंत्रण न देता भूमिपूजनही करण्यात आलं.”

कदम पुढे म्हणाले, “मतदारसंघात होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना मला डावलणं, कार्यक्रमाचं निमंत्रण न देणं या गोष्टींमुळे हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जातोय. त्यामुळेच 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय.”

महत्वाच्या बातम्या-

आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे

आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More