मुंबई | शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं. रमेश लटकेंच्या निधनाने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे.
रमेश लटके त्यांच्या कुटुंबियांसोबत दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार रमेश लटके यांचं पार्थिव दुबईतून मुंबईत आणण्याची तयारी सुरू झाली असून त्यांचं पार्थिव लवकरच मुंबईत आणलं जाणार आहे.
रमेश लटके हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. रमेश लटके यांनी सलग दोन टर्म शिवसेनेचे आमदार म्हणून काम पाहिलं आहे. 1997 साली आमदार लटके प्रथम मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, रमेश लटके यांच्या अकस्मित निधनाची बातमी समजताच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. तो पक्षाच्या पलीकडचा मित्र होता म्हणत नितेश राणेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Shocked to hear the news of Shiv sena MLA Ramesh Latke’s sudden demise!
I Remember meeting him on a flight to kokan for angnewadi jatra just few months back..
I praised him for losing so much weight because of dieting..
He was a friend beyond party lines..
Unbelievable!!
RIP🙏🏻— nitesh rane (@NiteshNRane) May 12, 2022
थोडक्यात बातम्या-
‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल
रुग्णालयातील फोटोंवरुन नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, पहिला गुन्हा दाखल
“नवनीत राणा या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत”
असानी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील ‘या’ भागावर परिणाम, हवामान विभागाचा गंभीर इशारा
धर्मवीर सिनेमाच्या टीमवर ‘समरेणू’च्या दिग्दर्शकांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.