बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्याकडे 500 पुरावे’; छगन भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची धाव

नाशिक | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा वादळी ठरला आहे.

आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली.

या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला ‘याची’ गरज नाही”

पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! मोदींच्या भेटीनंतर कमला हॅरिस यांनी दिला पाकिस्तानला इशारा

‘या’ लोकांना कोरोना लस घरीच मिळणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

‘तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण…’; सुधीर मुनगंटीवार ठाकरे सरकारवर बरसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More