बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेना आमदाराचे बिगडे बोल

मुंबई | राज्याच्या सर्वांगिण विकासाची ध्येय धोरणं ठरवण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे विधीमंडळ हे आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Meyor Kishori Pednekar) यांच्याबद्दल काही बोलण्यात आलं होतं. यावरून अधिवेशनात शिवसेना आमदार अजय चौधरी (MLA Ajay Choudhari) यांच्या एका वक्तव्यानं जोरदार गोंधळ झाला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांना काही दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती. आता राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thakarey) यांना धमकी मिळाली आहे. यावरून अधिवेशनात चांगलाच गोंधळ होत आहे. अजय चौधरी यांनी पेडणेकर यांना धमकी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या महिला नेत्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. अजय चौधरी यांनी टीका करताना सावित्रीच्या लेकीचा उल्लेख केला.

भाजपच्या महिला पदाधिकारी एरवी काही झालं की सावित्रींच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत सुटतात. किशोरी पेडणेकर या सावित्रीच्या लेक नाहीत का?, असा सवाल चौधरी यांनी केला. चौधरी यांच्या बोंबलत या शब्दावर भाजपनं आक्षेप घेत जोरदार गोंधळ घातला आहे. महिलांचा अपमान करणारे शब्द या सभागृहात कधीच सहन केले जाणार नाहीत, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना आमदार आणि भाजपमध्ये बराच गोंधळ सुरू होता. अखेर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला आहे. पण किशोरी पेडणेकर असो किंवा आदित्य ठाकरे यांना मिळालेली धमकी हा विषय अत्यंत गंभीर असल्याचं मत सर्वांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

नितेश राणेंना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी चौकशी होणार

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही सारखं सारखं बोलणार का?”

हिवाळी अधिवेशन: आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘पवार साहेबांमुळे शिवसेनेने भाजपला योग्य जागा दाखवली’; रूपाली ठोंबरेंचा घणाघात

“…तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More