बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर…”

मुंबई | एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. तरीही अजून कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम देखील बजावला होता. आता याच प्रकरणावरून शिवेसेनेचं मुखपत्र सामनाच्या आग्रलेखातून राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सामनामध्ये शिवसेनेनं संपाचे नेतृत्व करणारे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाउ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पडळकर, खोत यांनी आग लावली पण ती आग आता विझवत येत नाही. हे आंदोलकांच्या नेतृत्वाचे अपयश आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय खाज शमेल इतकेचं, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

पुढे सामनामध्ये म्हटलं आहे, संप हे भरघोस पगारवाढीसाठी असतात. सरकारने एस.टी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर कामगारांचे पुढारीच यापुढे कामगारांचे रक्षण करोत. अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?, असा टोला आग्रलेखातून पडळकर आणि सदाभाऊ खोतांना उद्देशून लगावला आहे.

याशिवाय पुढे आग्रलेखात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेणे म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीकाही सामनामध्ये करण्यात आली आहे. पगारवाढीची ऑफर दिल्यानंतरही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसलेले आहेत. मात्र, काही एसटी डेपोवरून एसटी सोडण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More