बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेला लढण्यासाठी तपास यंत्रणांची ‘चिलखते’ घालावी लागत नाहीत”

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shaha) यांचा पुणे दौरा विशेष चर्चेत राहिला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. हिमंत असेल तर राजीनामा द्या आणि एकटे लढून दाखवा, असे आव्हानचं अमित शहांनी शिवसेनेला दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून (Saamana) अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“अमित शहांचे नेमके वय किती ते माहित नाही. पण आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळवत आणि लोळवतच शिवसेना मोठी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे बोट धरायला कोणी तयार नव्हते तेव्हा त्या एकटेपणातून त्यांना बाहेर काढून खांद्यावर मिरवणारी शिवसेनाच आहे,” असा टोला शिवसेनेनं सामनामधून लगावला आहे.

“2014 साली ते स्वत: अध्यक्ष असतानाही त्यांनी हिंदूत्ववादी शिवसेनेशी नाते जोडले होते. तेव्हा शिवसेना एकटेच लढली होती. शिवसेनेला एकट्याने लढण्याची, अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन लोळविण्याची सवय आहे,” असंही सामानामध्ये म्हटलं  आहे. याशिवाय शिवसेनेला लढण्यासाठी तपास यंत्रणांची चिलखते घालावी लागत नाहीत, असा खोचक टोलाही सामनातून लगावला आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी पुणे दौऱ्यावर असताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला होता. “तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत. तिघांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढा,” असा घणाघात अमित शहांनी केला होता. यावर शिवसेनेनं सामनातून उत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

‘नाद नाय करायचा राजेंचा’ भर कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉलर उडवत केला डान्स

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

‘…म्हणून दारु दर कमी केले’; अजित पवारांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More